तुझाच मी अन माझीच तू...भाग ३

(19)
  • 23.7k
  • 15.2k

तुझाच मी अन माझीच तू...भाग ३ दोघी गप्पा गोष्टी करत डबा खात होत्या. पाच दहा मिनिटे झाली आणि राजस दोघींसमोर हजर झाला... त्याला बघून नेहा तर आनंदी झालीच पण आभा ला सुद्धा छान वाटले.. आपण सकाळी जरा जास्ती बोलून गेलो ह्या जाणीवेने राजस ने आभा शी बोलणे टाळले.. त्याने तिच्याकडे पाहिलं पण नाही.. पण नेहा ने मात्र त्याच्याशी बोलायला चालू केलं, "राजस? येणार नव्हतास ना लगेच?" "ठेवलीस ना ग मला भेंडीची भाजी? भेंडी च्या भाजीच नाव ऐकलं आणि मला पुढच्या क्षणी उत्तर मिळाला..मग पटापट काम आवरून आलो लगेच डबा खायला.. पोटात कावले ओरडत होते.." राजस ने हसत