अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 5 - अंतिम भाग

(12)
  • 7.4k
  • 3.4k

(५) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?खोलीत गेल्यावर लताने पत्र काढले. हळू आवाजात वाचायला सुरुवात केली. कोणताही मायना न लिहिलेल्या पत्रात लिहिले होते...'तुझे नाव घेण्याची माझी लायकी नाही आणि तो अधिकार मी गमावून बसलो आहे. तुझा कोणताही गुन्हा नसताना, अपराध नसताना आणि मी केलेल्या चुकांची तसेच माझ्या मौन वागण्याची शिक्षा तुला मिळते आहे हे मला माहिती आहे. एका अर्थाने मी तुझा खून केलाय ही बोचणी, ही अपराधाची भावना, जाणीव मला होते आहे. तू निर्दोष आहेस, तुला एड्ससारखा महाभयंकर रोग माझ्यापासूनच झालाय हे जसे मला माहिती आहे, तसेच ते माझ्या आईबाबांनाही ठाऊक आहे. तू विश्वास ठेव असे मी म्हणणार नाही, तसे सांगणार नाही