स्पर्श - भाग 13

(30)
  • 15.6k
  • 1
  • 10.1k

रात्र तर मित्रांसोबत कशी तरी गेली होती पण उद्याचा संपूर्ण दिवस काढणं कठीण जाणार होत ..सकाळ झाली आणि सर्वच आपल्या - आपल्या कामावर निघाले ..मी शाश्वतला वेळेवर यायला सांगितलं आणि तोही जॉबवर गेला ..बॉसने आज काही मेल केले होते ..खर तर इच्छा नव्हती पण वेळ जावा म्हणून थोडं काम करून घेत होतो ..शाश्वतला दुपारीच भेटण्याचा पत्ता विचारला होता पण तो मला स्वताच न्यायला येणार होता त्यामुळे ते टेंशन कमी झालं ..राहुलला मी येण्याचं माहिती नव्हतं त्यामुळे त्याने कस रिऍक्ट केलं असत काहीच अंदाजा नव्हता कारण कॉलेज जीवनात आमचं कधी पटलं नव्हतं पण उत्तरासाठी आज मी सर्व काही करायला