होय, मीच तो अपराधी - 2

  • 7.4k
  • 3.7k

२) होय, मीच तो अपराधी! "मायलॉर्ड..." जेवणाच्या मध्यंतरानंतर कामकाज सुरू झाले न झाले की, नलिनीचा आर्त स्वर ऐकून सर्वांचे लक्ष नलिनीकडे गेले. ती पुढे म्हणाली, "माफ करा. काही वेळापूर्वी आपण या अपराध्याचे म्हणणे ऐकले. या नराधमाला असे म्हणायचे आहे का, की या देशात होणारे बलात्कार केवळ मुलींच्या पोशाखांमुळे आणि वागण्यामुळे होतात काय? प्रत्येक वेळी मुलीच दोषी आहेत का? करून सवरून... मजा मारणाऱ्या मुलांचा काहीच दोष नाही?""मी असे म्हणालोच नाही. सद्यस्थितीत मुले कशी बळी पडताहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. जजसाहेब, आजची प्रसारमाध्यमे, त्यावरील कार्यक्रम, उत्तान जाहिराती आणि मुलींचे असे वागणे हे..हे.. जे एक चक्रव्यूह निर्माण झाले आहे ना,