दोन टोकं. भाग २०

(16)
  • 11.4k
  • 5.7k

भाग २० आकाश विशाखाला सोडुन घरी आला. आईने बघितलं तर गाणं गुणगुणत हातात चावी फिरवत हसत हसत येत होता. आईला बघुन ब्रेक मारल्यासारखा थांबला. तीला बघुन हसला तरीही आई त्याच्याकडेच बघत होती. " काय झालं ?? असं का‌ बघतीये ? " चेहऱ्यावर कशीबशी स्माईल ठेवत त्याने विचारल पण मनात धाकधूक ही होती की ही अशी काय बघतीये ?. " काही नाही. बघतीये की आजकाल जरा जास्तच खुश आहेस नाही का ? " " कोण मी ?? " " नाही तो शेजारचा पिंट्या. " " सॉरी मला विचारलं म्हणजे मीच असणार ना ?"" इतकं कळतंय तर कशाला विचारावं ? " " अरे मी तर नेहमी हॅप्पी असतो, माहिती