नवनाथ महात्म्य भाग १५

  • 8.6k
  • 3.2k

नवनाथ महात्म्य भाग १५ म्हणजे हा रेवणनाथ आपला गुरुबंधु होतो आहे असे जाणुन त्यास साह्य करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्याने लगेच तेथून निघुन गिरीनार पर्वती येऊन श्रीदत्तत्रेयाची भेट घेतली व रेवणसिद्धची सर्व माहिती कळवली आणि त्याच्या हितासाठीं पुष्कळ रदबदली केली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज ! रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार होय. तो तुमच्यासाठीं दुःसह क्लेश भोगीत आहे. तर आपण आतां त्यावर कृपा करावी. ज्या ठिकाणीं तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे. ते ऐकून मच्छिंद्रनाथास सोबत घेऊन दत्तात्रेय यानास्त्राच्या साह्याने रेवणनाथापाशी आले. तेथे तो काष्ठाप्रमाणे कृश झालेला दिसल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशी