नवनाथ महात्म्य भाग १७

  • 9.3k
  • 2.8k

नवनाथ महात्म्य भाग १७ मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता जायचा नागनाथाने निश्चय केला. कोणास न विचारता घरुन निघाला व मातापुरी, पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करु लागला. परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळें कोल्हापुरास गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयीं चौकशीं करु लागला . तेव्हा लोक त्याला हसले व दत्तात्रेय येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रुपानें येऊन भिक्षा मागुन जातो असे त्यांनी सांगितले. ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारले . या नाथाच्या प्रश्नावर लोकांनीं उत्तर दिले की तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करीत नाहीं. येथें अन्न न मिळाले तर तो उपवास करील,