स्पर्श - भाग 19

(27)
  • 15.1k
  • 9.5k

" खूप सोपं आहे ग मानसी तुझ्या आठवणीत हरवणं पण खरंच खूप कठीण आहे तुझ्याविना राहणं ..मला हा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे ..स्वताची एक वेगळीच दुनिया बनवायची आहे पण राहील ग सर्वच अपूर्ण ..तू भारतातच शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतलास आणि मला इथे एकटच दूर राहावं लागतं आहे ..तू आयुष्यात नव्हतीस तेव्हा खूप जास्त मिस केलं पण आता तू माझी असतानाही हा दुरावा सहन होत नाही " , मी मानसीला फोनवर सर्व सांगत होतो ..तिनेही एकूण सुस्कारा सोडला आणि म्हणाली , " कळतय रे अभि मी चूक केली पण ते होऊन गेल..खूप खूप सॉरी ..तुझंच काय प्रत्येक