परवड भाग १३

(12)
  • 7.9k
  • 3.9k

भाग १३ सुनंदा आणि अरविंदाचा नवा संसार सुखासमाधानाने चालू झाला होता.संपूर्ण विचारांती दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.अशा लग्नांमध्ये ज्या तडजोडी कराव्या लागणार होत्या त्याची दोघांनीही आधीच मानसिक तयारी केलेली असल्यामुळे दोघांचेही छान टयूनिंग जमले होते.सुखाचा नवा अध्याय सुरू झालेला होता. दिवस पुढे पुढे जात होते.अरविंदा आता पूर्वीपेक्षा खूपच निवांत झाला होता.महिन्याच्या महिन्याला येणारी पगाराची रक्कम तो सुनंदाच्या हवाली करू लागला.घरातले सर्व दैनंदिन व्यवहार आता सुनंदाच्या हवाली केलेले होते आणि ती आपल्या नव्या संसारात मनापासून लक्ष देत होती. सीतेची जागा घेवून घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेणारी कामसू बायको आपल्याला मिळाली याचे अरविंदाला मनापासून समाधान होते.समाधानी आनंदी जीवनामुळे अरविंदाच्या वागण्याबोलण्यात एक वेगळाच