स्पर्श - भाग 20

(26)
  • 17.8k
  • 1
  • 10.8k

ती माझ्या मिठीत होती आणि मी मिठी घट्ट करू लागलो ..ती मिठी सैल करत कुशीतून निघाली ..तिच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता पण माहिती नाही मला ती दुःख लपविण्यासाठी आनंद दाखवत आहे असच वाटत होतं..क्षणाला वाटायचं की तिला सर्व काही विचारावं पण मला हे क्षण खराब करायचे नव्हते ..मी शांत होतो आणि ती कपडे चेंज करून आली ..मीही कपडे चेंज करून बेडवर परतलो ..दोघेही शांत पडून होतो ..कुणीच कुणाकडे पाहत नव्हतं पण झोपलो मात्र नव्हतो .." अभि तू झोपला आहेस ? " , मानसी म्हणाली आणि मी फक्त वर सिलिंगकडे पाहू लागलो . ती पुन्हा एकदा बोलू लागली , "