प्रित - भाग 3

(12)
  • 5.8k
  • 1
  • 2.2k

शाॅपिंग झाल्यावर प्राची आणि अमृता काॅफी शाॅप मध्ये येतात तेव्हा श्री आधीच तिथे आलेला असतो व त्याच्या सोबत अदित्य असतो. अदित्यला श्री सोबत बघुन प्राचीला आश्चर्य वाटतं. ती स्वतः ला एक चिमटा काढते. अदित्य आणि श्री काहीतरी बोलत असतात. प्राची आणि अमृताला आलेलं बघून ते गप्प बसतात. श्री प्राची व अमृताला बसायला सांगतो. प्राची श्रीला म्हणते, "तूम्ही दोघं एकत्र कसे?" "का? आम्ही सोबत नाही बसू शकत का?" श्री तिची गम्मत करत असतो. "नाही तसं नाही पण.." प्राची "पण काय हं? आम्ही मित्र आहोत. आमच्यात रुसवे फुगवे चालूच राहणार. " अमृता "म्हणजे वहीनी तू पण" प्राची "हो, मी पण." अमृता