बळीराजाचा टाहो

  • 10.7k
  • 1
  • 2.8k

बैलपोळा निमित्त विशेष लेख : बळीराजाचा टाहो बळीराजाच्या राब- राब राबण्यातील कष्टत झीजण्यातील प्रत्येक क्षण दुःख संवेदनेत, कुटुंब विवंचनेत चिंतेत पुरलेला असतो. “एक बिजा केला नाश, मग भोगिले कणीस!!” या संत तुकारामाच्या तत्त्वज्ञ ओळीचा सारांश त्याच्या प्रत्येक रुधीर कणात आणि जीवनातील प्रत्येक क्षणात निपजलेला असतो. हे तत्वज्ञान साधेसे नाही तर एक बीज शेतीत पेरल्यावर त्यातून कणसाचे ढीग, रास निर्माण होते, हे त्या बळीराजालाच ठाऊक असते. असं निर्मितीचं तत्वज्ञान डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतापेक्षाही अनोखे आहे, वेगळे आहे. पण आमच्यासारख्या पांढरपेशा सुसंस्कारित आत्ताच्या बहुजन समाजाने हे समजून घेतलेही असेल पण बापजाद्यांनी जगलेला तुकाराम वा ज्याच्या बळावर आम्ही पोसले जात आहोत त्या