परतफेड

  • 7.2k
  • 2.1k

सुमनच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. कधीकधी तर दोन वेळच्या जेवणाचीही पंचाईत व्हायची. वडिलांचा पगार तुटपुंजा होता. आईवर लहानग्या भावाची जबाबदारी होती. तरीही सुमनने खूप शिकावे अशी तिच्या आईची इच्छा होती. आईच्या उपदेशांमुळेच का होईना शिकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती लाभलेली सुमन विज्ञानात बारावी पास झाली आणि आईला आनंद झाला. तो क्षण काहीसा खास यासाठी होता कारण आदल्या रात्री घरात सर्वजण उपाशीच झोपले होते. वडिलांची नोकरी गेली होती, आता ते हातावर मिळेल तिथे काम करू लागले होते. कित्येक वर्षांत सुमनला नवीन कपडे मिळाले नव्हते. आसपास राहणाऱ्यांपैकी एखाद्या मुलीला कपडे तोकडे होऊ लागले की ते सुमनकडे यायचे. ते वापरून मिळालेले कपडे घालतानाही सुमनच्या चेहऱ्यावर