महती शक्तीपिठांची भाग १

  • 14.1k
  • 5.6k

महती शक्तीपिठांची भाग १ अन्य स्थाने वृथा जन्म निष्फलम् गतागतम्। भारते च क्षणं जन्म सार्थक शुभ कर्मदम्।। वरील पदाचा पुराणात आध्यात्मिक आणि सखोल अर्थ आहे. भारतात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्रांत शक्ती पीठाचे विशेष महत्त्व आहे. अशा शक्ती पीठात साधना करून अनेक साधू-संतांनी परमतत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. प्राचीन काळातील ऋषी-मुनींची नावे आजही मोठ्या श्रद्धेने घेतली जातात. परमतत्वाचा अनुभव प्राप्त झालेले स्वामी करपात्री महाराज उर्फ महोपाध्याय गोपीनाथ ‍कविराज यांच्या नावाचा उल्लेख आजही विसाव्या शतकात केला जातो. अनेक पाश्चात्य विद्वानांनी भारताच्या पावन भूमीवर स्वत:ला परमतत्व दर्शनाच्या अंतिम टप्प्यावर नेलेले आहे. शिवाय अनेक पाश्चात्य पंडितांनी यावर धार्मिक ग्रंथही लिहिले