मला बहीण होती - भाग दुसरा

  • 7.1k
  • 1.8k

ह्या कथेचा पहिला भाग मी 8 फेब्रुवारी 2019 ला सादर केलेला असून कथेचा दुसरा भाग सादर करतोय.... आम्ही तिला पुरवून आलो, घराबाहेर आता स्मशान शांतता पसरली होती. घरात जाऊन बघितलं तर आई तीच करायला लागली होती, बाबाही आवराआवर करत होते, स्वयंपाक खोली ओलांडून मी माझ्या खोलीत शिरलो तर कुणीतरी एका कोपऱ्यात माझं सामान आधीच नेऊन ठेवलेलं होत, माझी नि तिची खोली एकच होती, खोलीतले दोन कोपरे तिचे तर दोन कोपरे माझे, भिंतीवर लावलेल्या त्या माझ्या फोटोवर माझ लक्ष गेलं, तो लहानपणीचा माझा फोटो अजूनही तिथेच होता, मला आश्चर्य वाटत होतं, तो अजून तिथे कसा काय, अस म्हणतात ना की