अरण्यऋषीस पत्र - मारुती चितमपल्ली

  • 8.9k
  • 1
  • 2.1k

माननीय श्री. मारुती चितमपल्ली सर यांस, माझा नमस्कार. आपल्याला पत्र लिहावे ही खूप दिवसांपासूनची इच्छा होती, आज पूर्ण करावयास घेत आहे. पत्र लिहिण्यास कारण की, मागील काही वर्षांपासून आपली पुस्तके माझ्या वाचनात आली आणि त्या पुस्तकांनी मुळात असलेली माझी निसर्गाविषयीची गोडी आणखी तीव्रतेने वाढवली. निसर्गाविषयी भरभरून लिहिल्या गेलेल्या आपल्या अनमोल साहित्याशी माझी गाठ पडावी, हे मी माझे भाग्य समजतो. आपल्या पुस्तकांच्या रूपाने मला जीवनातल्या असंख्य पैलूंशी संवाद साधता आला. खरेतर एक लेखक म्हणून मला आपल्या साहित्यातून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. म्हणूनच हे पत्र म्हणजे आभार प्रकट करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.मुळ तेलगू असलेल्या आपण मराठी भाषेवर दाखवलेलं प्रेम कधीही न विसरण्यासारखे आहे. आपल्या