फॉरवर्ड

  • 6.7k
  • 1
  • 2.1k

"फॉरवर्ड"(कन्सेप्ट - संदीप चिपरे, स्क्रिनप्ले & डायलॉग्स - सूरज गाताडे)FADE IN: 1) INT. BAR - DAY(एक व्यक्ती, दाढीची खुरटे वाढलेली. बराच सावळा. डोळे लाल. कपडे अस्ताव्यस्तच, बिअर खरेदी करून बाहेर घेऊन जाते...)1 A) EXT. BAR (त्याचा मित्र रंग-वेष बराचसा त्या व्यक्ती सारखाच. बाईकवर रेडीच असतो. बार मधून बाहेर आलेली व्यक्ती बाईकवर असलेल्या मित्राला बाटली हँड ओव्हर करते व मागे बसते. मित्र बाईकच्या हँडलला असलेल्या पिशवीत ती बाटली ठेवून देतो व आपल्या तोंडात असलेली सिगरेट मागील व्यक्तीला देतो. सिगरेटचे भपके घेत असतानाच तोच त्या व्यक्तीची कशावर तरी नजर पडते व तंद्री लागणारे त्याचे डोळे किलकिले होतात. काही तरी आठवण्यासाठी कपाळावर आठ्या आणत ती व्यक्ती