परवड भाग १५

(12)
  • 8.4k
  • 3.8k

भाग १५ अशी नाटके करण्यात मुळातच पटाईत असलेल्या सुनंदाने आपल्या आवाजाची पट्टी अशी काही वाढवली होती की वसंता रडणे थांबवून एकदम चिडीचूप बसला. त्याला आता वाटायला लागले की आपलीच चूक झालीये ! तो निपचित पडून विचार करू लागला.... तसंही नियतीने आपल्याला जन्माला घालूनच खूप मोठी चूक केल्याची भावना त्याच्या मनात वाढू लागलेली होती."आपण या जन्मात तरी कुणाचे काही वाईट केलेले नाही;पण नक्कीच आपल्या पूर्वजन्मात आपल्या हातून काही तरी महापातक घडलेलं असणार आहे त्याचे फळ म्हणूनच आपल्या आयुष्यात एकापाठोपाठ एक अशा विचित्र गोष्टी घडत आहेत.माझ्या बरोबर माझ्या वडिलांनाही खूप काही भोगावे लागते आहे.त्यांनी नेहमी माझ्या हितासाठीच निर्णय घेतले;पण नियतीने टाकलेला