अग्निदिव्य - भाग 3

  • 7.2k
  • 3k

सायंकाळचा समय, चुकार पांढऱ्या ढगांवर सूर्याची किरणं तांबूस रंग चढवल्या सारखी वाटत होती. अंधार दाटू लागला होता. सदरेवरील समया प्रज्वलित करण्यासाठी कामगारांची लगबग चालू होती. राजे सदरेवर बसले होते. मूठ कपाळावर टेकवून नजर जमिनीवर खिळली होती. सर्व सरदार मानकरी खाली माना घालून बसले होते. सदर शांत होती. हेरांकडून नेतोजीरावांना पन्हाळ गडाकडे राजांच्या सैन्याची उडालेली दाणादाण आधीच कळली होती. विशाळगडावर येतानाच त्यांना मावळ्यांच्या मुजऱ्यात झालेला बदल लक्षात आला होता. आता आपल्यावर काय गुजरणार आहे, याची त्यांना चांगलीच कल्पना होती. पण आल्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय आता काही मार्गच उरला नव्हता. गडावर पोहोचता पोहोचता सायंकाळ झाली होती. आज