कादंबरी -प्रेमाची जादू - भाग ३ रा

(11)
  • 12.4k
  • 6.4k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३ रा ------------------------------------------------------- पहाटेचे पाच वाजले ..आणि यशच्या मोबाईल मध्ये मिस कॉलची रिंग वाजली . आवाज ऐकून यश उठला , रेल्वे स्टेशनवर जायचे आहे ..याची आठवण देण्यासाठी बाबांनी आपल्याला उठवले आहे “.हे यशच्या लक्षात आले. तसे तर तो ही जागा झालेलाच होता , साडेपाचला निघू या अस त्यचा हिशेब चालूच होता , पण, त्याचे बाबा वेळेच्या बाबतीत फारच काटेकोर ..सगळ्यापेक्षा अगोदर त्यांचीच घाई-गडबड सुरु असते ..आता सवयीने सगळेजन त्यांचे घाई घाई करणे ऐकून घेत चुपचाप आपापली कामे करीत असतात . यश त्याच्या रूममधून हॉलमध्ये आला. डायनिंग –कम –हॉल अशा नव्या पद्धतीची ही व्यवस्था सगळ्यांना आवडली