स्वप्नभंग - जेव्हा ती पुन्हा दिसते

  • 6.8k
  • 1.6k

चांदण्या रात्री घराच्या माळ्यावर मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. गार वारा सुटला होता पण अंगाला तो बोचत नव्हता तर वेगळाच स्पर्श करत होता. त्या अथांग पसरलेल्या आभाळातील असंख्य चांदण्या मोजण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो आणि चुकत सुध्दा होतो आणि चुकण्याचे एक सुंदर कारण सुद्धा होते. आज ती मला दिसली होती अगदी तिथेच त्याच ड्रेस मध्ये त्याच जागी जिथे पहिल्यांदा ती मला दिसली होती. जरी मी घराच्या माळ्यावर असलो तरी मी अजून सुद्धा सकाळच्या ट्रेन मध्ये होतो. जेव्हा ती दिसली तेव्हा सर्व जुन्या आठवणी अगदी चल चित्राप्रमाणे डोळ्यासमोर येत होत्या जस चित्रपटात नटाला खूप वेळा नंतर किंवा त्याची नटी त्याला