पोटच्या गोळ्याची गोष्ट

(20)
  • 14.7k
  • 1
  • 4.7k

"पोटच्या गोळ्याची गोष्ट "" काय झालं रे दादा? इतक्या अर्जंट बोलावून घेतलंस.? " हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकताच शामने पहिला प्रश्न विचारला. " अरे काही नाही.. आबांची तब्येत जरा जास्तच... "" तू घ्यायचेस की रे दादा सांभाळून.. " रामचे बोलणे पूर्णही होऊ दिले नाही. शाम मध्येच बोलला," तुला तर माहितीये ना मला किती मुश्किलने सुट्टी मिळते ती... तू आहेस ना रिकामा! "" हो मी तर आहेच रे.. " राम समजावू लागला, " पण डॉक्टर म्हणाले जरा गंभीर बाब आहे. म्हणून तुला बोलावून घेतलं." "अच्छा.. काय प्रॉब्लेम आहे? "" तीन चार दिवसांपासून सारखं पोट दुखतंय आबांचं... काल इथे आणलं तर डॉक्टर म्हणाले आॅपरेशन करावे लागेल.