जेव्हापासून जाणत वय झालं तेव्हपासून ऐकत आलो होतो की इथे हजारो वर्षांपासून पुरुषांनी स्त्रियांवर फक्त अत्याचार केले आहेत ..जर विचार केला तर हे खरं आहे पण आज याच पुरुषाला एका स्त्रीला अस्तीत्व मिळवून द्यायचं होत आणि तिच्या प्रत्येक पावलावर मी साथ देण्यासाठी तयार झालो ..कधीच वाटलं नव्हतं की ती पुन्हा एकदा कॅनडाला परत येईल पण ती आली ..एकदा लग्न करून आली होती तेव्हा सर्वच तिच्या सोबत होते पण यावेळी येताना तिला जगण्याचीही इच्छा नव्हती ..तेव्हा मानसीला जग किती सुंदर असत हे दाखवणं गरजेचं होतं ..आयुष्यात दुःख कुणाला नसतात पण जो या दुःखांशी संघर्ष करतो आणि त्यांना हरवतो त्यालाच