वरूण राजास पत्र

  • 8.8k
  • 2.5k

वरूण राजास पत्र!प्रिय वरूणराजास, पत्र लिहायला घेतले तर खरे पण प्रिय लिहिताना हात क्षणभर अडखले. नंतर अभिवादन म्हणून काय लिहावे हाही प्रश्न पडलाच. तू आमची, शेतबागांची, प्राण्यांची, वृक्ष वेलींची तहान भागवतोस, ही धरती, ही सृष्टी शोभायमान करतोस, मनमोहक करतोस, धरतीमातेच्या सहाय्याने आम्हा प्राणिमात्रांची भूक भागवतोस म्हणून प्रिय हा मायना लिहून नमस्कार, साष्टांग नमस्कार या प्रकारचे अभिवादन करावे म्हटले तर दुसऱ्याच क्षणी तू गत् वर्षी घातलेला हैदोस आणि काही दिवसांपूर्वी कोकणात