एक पत्र निष्ठावंत कार्यकर्त्यास

  • 9.7k
  • 3.1k

एक पत्र निष्ठावंत कार्यकर्त्यास!प्रति,निष्ठावंत कार्यकर्ते,(सर्व पक्ष आणि संघटनांमध्ये दडलेले.)स.न.वि.वि. काय म्हणता? कुठे आहात? काय करीत आहात? अज्ञातवासात तर गेला नाहीत ना? आजकाल फारशी भेट होत नाही म्हणून हा पत्रप्रपंच! कुठे तुम्ही दिसलात तरी तेवढ्या पुरते! कामापुरता मामा झालाय का तुमचा? असा कसा हो सोशीक स्वभाव तुमचा? आपण भले नि आपले काम भले याप्रमाणे वागताना पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा, सत्यवचनी, एकनिष्ठ अशा तुमच्या स्वभावाचा आणि वृत्तीचा क्षणोक्षणी फायदा घेतला गेला, घेतला जातोय. जीवाचे रान करून, प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही पक्ष,संघटना तळागाळापर्यंत नेऊन ठेवता, पक्षाचे विचार सामान्य माणसांपर्यंत