इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

  • 5.8k
  • 1.7k

हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौकर सुट्ट्या मंजूर करवून घेत माधव यावेळी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात गावी आला होता. उगाच कुठलं संक्रमण नको, या कारणानं घेतलेली योग्य अशी ती खबरदारी होती. जगभर कोरोनोच्या विषाणूने आपला इंगा दाखवला होता. दगावणाऱ्या माणसांचे आकडे वाढत होते. याव्यतिरिक्त सगळीकडे अफवांचे पेव फुटले होते. शिवाय आता उगाच पसरवलेल्या अफवा माधवच्या गावापर्येंत येऊन धडकू लागल्या होत्या. 'कोंबडी खाल्ल्याने हा आजार होतो' त्यातल्या या एका अफवेनं मात्र गावातल्या खूप जणांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. तसं गावात कोंबडीचं दुकान नव्हतंच. खाणारी लोकं पुढच्या गावाकडे जाऊन आणत असत. पण तरीही खबरदारी म्हणून