कादंबरी- जिवलगा ...भाग -३६ वा

(15)
  • 13.6k
  • 7k

कादंबरी – जिवलगा भाग -३६ वा ----------------------------------------------------------- येणाऱ्या रविवारी हेमूच्या गावी मामा,मामी आणि एक फमिली त्यांच्या मुलीला घेऊन येणार आहेत हे कळल्या पासून हेमू आणि नेहा दोघांचा मूड गेलेला होता . शुक्रवारी सकाळी नेहेमीप्रमाणे दोघे ही ऑफिसला आले . थोड्यावेळाने हेमू नेहाला म्हणाला ,हे बघ ..मी काय म्हणतो ते शांतपणे ऐकून घे , आणि तू अजिबात अपसेट होऊन जाऊ नको . तुला असे पाहून माझा निर्धार डळमळू लागतो . नेहा म्हणाली – हेमू, काही तरीच टेन्शन आलाय हे , किती छान पार्टी झाली आपली , किती खुश झालो होतो आपण सगळे .. पण, तुझ्या मामाचा फोन काय आला , आणि