कादंबरी -प्रेमाची जादू - भाग -४ था

  • 11.4k
  • 5k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ४ था -------------------------------------------------------- बापू-आजोबा आणि अम्मा –आज्जी यांना येऊन आता आठवडा झाला होता. गाव बदलले की हवामान बदलते, पाणी बदलते ..हा बदल लगेच सहन होईल असे नसते .. मोठ्या –आणि वयस्कर माणसाना काही न काही त्रास होतोच असतो , त्यात फारसे काळजी करण्या सारखे काही नसते , गोष्टी अशा सहजपणे घेण्याची सवय यशच्या घरातील सगळ्यांना होती. त्यामुळे .. थोडाफार त्रास झाला तरी तो सहन करीत आजी –आजोबा म्हणत.. अरे पोरांनो ..तब्येतीच्या या सगळ्या कुरबुरी वयोमानानुसार होणार्या आहेत ..त्याचा गवगवा आणि बागुलबुवा न करता .आपलं आपण सहन करीत ,आराम करीत काळजी घेत राहिलं की .आराम पडतो. अगदी