खविस

  • 15.9k
  • 1
  • 4.4k

दिवाळीचा महिना. वाडा मावळात म्हणजे जाग्याला पोचलेला. कुळा नुसार गावच्या वाटण्या पडलेल्या, म्हंजी जागा. जसं, लव्ही मेरावने, वाजे घर पिप्री तोंड वरती कर. पिप्री गावच्या घराची तोंडं सुर्याच्या मावळत्या दिशेला होती म्हणून आम्हाला आमचे आजी आजोबा म्हणायला लावायचे, 'लव्ही मेरावण्यापासूनचा सगळा भूभाग हा आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी दिला आहे'. त्या जाग्यापासून ते पूर्वेला आस्कवडी गावापतोर मेंढ्यांना चारायला दिलेला पट्टा. धनगर गावोगाव आठ म्हयनं मेंढ्या चारत. शेवटाला, म्हंजे पावसाळा आला की हळूहळू आपापल्या गावाकडं चालतं व्हायचं. हे समद्या धनगरांचं दरसालचं ऋतु चक्रच. डोंगर दऱ्यातून वाहणारी छोटीशी नदी, नदीच्या काठावर एक छोटी वाडी, राजगडाच्या पायथ्याला वसलेली. गच्च झाडं झुडपांनी