सौभाग्य व ती! - 1

(15)
  • 13.3k
  • 6.5k

१) सौभाग्य व ती ! वैशाख पौर्णिमेची रात्र. दहा वाजत होते. चंद वरवर येत होता. स्वच्छ चांदणं पृथ्वीवर पसरलं होतं. त्या चांदण्यात पृथ्वीवरील सजीव आनंदाने नाहत होते. चित्कारत होते. ती नगरीही चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशाने पूर्ण आनंदली होती. त्या शहरात वतनदारांचा एक मोठा वाडा होता. त्या वाड्यातील लग्नाची घाई संपली होती. वाड्यामध्ये वाजतगाजत आलेली नयन वाड्यातल्या एका खोलीमध्ये सजूनधजून बसली होती. नवीन पैठणी, फुलांचा गजरा लेवून ती पलंगावर बसून तिच्या जीवनसाथीची, सर्वस्वाची, दैवताची वाट पाहात होती. त्या