कादंबरी- जिवलगा . भाग -३७ वा

  • 13.7k
  • 1
  • 6.7k

कादंबरी – जिवलगा भाग -३७ वा ------------------------------------------------------- ट्रेनमध्ये हेमू प्रवास करीत होता हे खरे ..पण..त्याचे मन, ते तर कधीच विचारात बुडून गेले होते ..की उद्या शनिवार ..आणि मग रविवारी काय काय घडणार आहे कुणास ठाऊक ? मामा एखादेवेळी ..समजून घेईल सुद्धा .. पण.मामी .तिला जेव्हा आपली लव्ह-स्टोरी कळेल आणि तिने पसंत करून ठेवलेल्या मुलीला नकार मिळणार आहे हे जेव्हा जाणवेल .. त्यानंतर जे काही होईल ..त्यातून फक्त ..गोंधळ आणि गोंधळ , नात्यामधले तणाव वाढणे , आणि गैरसमजाने एकमेकात धुसफूस होणार .. हेमुने आपण ठरवलेल्या पोरीला नकार दिलाय “ ही गोष्ट मामी स्वतःचा मोठा अपमान झाला आहे “ही भावना मनात खोलवर धरून ठेवणार