मातृत्व - एक संघर्ष असाही

  • 11k
  • 3k

मातृत्व हे महिलांना लाभलेले वरदान जरी असले, तरी काही महिला यापासून वंचित राहतात. समाज त्यांना वेगवेगळी दूषणे लावून हिणवतो. नातेवाईकांकडून टोमणे ऐकावे लागतात. आई होण्याचं भाग्य लाभलेली स्त्री आणि कधीही आई न होण्याचा शाप जगणारी स्त्री या विषयांवर आपल्याकडे बऱ्याचश्या कथा, कविता येत असतात. असे विषय लेखक लिहितात, वाचकांकडून ते वाचले जातात. चर्चेत बोलले जातात.परंतु त्या दोहोंच्या मध्येदेखील एक अशी स्त्री असते जी शापित नसली तरी ती व्याकुळतेने वरदानाच्या प्रतीक्षेत असते. बदलत्या काळानुसार अश्या दाम्पत्यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. मुल लौकर होत नाही वा तत्सम विषयांवर आपला समाज किंवा स्वतः ते दांपत्यही चारचौघात बोलायचे टाळते. म्हणूनच