लेडीज ओन्ली - 1

  • 10.5k
  • 1
  • 4.6k

लेडीज ओन्ली || एक ||'प्रो महाराष्ट्र' वृत्तवाहिनीच्या न्युज रूममध्ये प्राईम टाईमची लगबग सुरू होती. दोन तीन कॅमेरामन अन् त्यांचे चार पाच सहकारी कॅमेरा सेट करण्यात व्यस्त होते. दोघेजण खुर्च्या अन् त्यासमोरचा भला मोठा टेबल व्यवस्थित लावण्यात गुंतलेले तर पलीकडच्या कोपर्‍यात मेकअपवाल्या मुली पाहुण्यांच्या तोंडावर ब्रश वगैरे फिरवत होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असताना प्राईमटाईमची अँकर मात्र अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. निकिता साबळे नाव तिचं. खरं तर लाईव्ह शो सुरू व्हायला अजून काही मिनिटांचाच अवधी उरला होता. पण निकिताचं मन स्थिरावत नव्हतं. अजून तिचं मेकअपही बाकी होतं. मेकपमनने तीन चार वेळा आवाजही दिला. पण छे... शेवटी ती न राहावून