सौभाग्य व ती! - 3

  • 8.2k
  • 1
  • 4.2k

३) सौभाग्य व ती ! बाळंतपणासाठी माहेरी आलेली नयन स्वयंपाकघरात चुलीपुढे बसी होती. तिची आई भाकरी करीत होती. चुलीतल्या जाळावर तवा गरम होत होता. तापलेल्या तव्यावर भाकरी भाजल्या जात होत्या. घरात कुणी नाही, तवा तापलाय तेव्हा आपणही... या विचारात ती आईला म्हणाली, "आई... ए.. आई..." "काय ग? काय खावे वाटते तुला? काही करू का?" "तसे नाही..." "नैने, तुला माहेरी येवून अजून चार तासही झाले नाहीत तर तुला त्यांची आठवण... थकलीस का? जरा पडतेस का? भाकरी झाली की मी