कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ६ वा

  • 8.6k
  • 3.7k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – ६ वा -------------------------------------------------------------------- दिवसभराचे कामे आटोपली की.आजी-आजोबांच्या सोबत चहा-चे राउंड करीत करीत गप्पा करण्याचा नवा टाईमटेबल घरात सुरु झालेला होता. यशला या गप्पा-मैफिलीची आवड होतीच अम्माआज्जी आणि बापूआजोबांच्या येण्याने यशच्या घराचे नाव – गोकुळ “अगदी सार्थ आहे असे वाटत होते . घरातली मोठी माणसे मनमिळाऊ आणि अगत्यशील स्वभावाची असली की भवताली असलेल्या लोकांच्या मनावर याचा खूप चांगला प्रभाव पडतो “. प्रत्येकाला आपलेपणाच्या भावनेतून इथे यावे वाटते . आणि सतत माणसांचा राबता असलेले असे घर पाहून ..सहजतेने म्हटले जाते अगदी नावाप्रमाणे आहे हो हे घर ..भरलेले “गोकुळ “. यश मनाशी विचार करीत असे –