६) सौभाग्य व ती ! त्यानंतर सदाशिवने ते रूप, तो अवतार कायमच धारण केला. नयन त्यामुळे भयभीत, आतंकित राहू लागली. तिने तोंड उघडण्याचा अवकाश हातात येईल त्याने तिला मारायला धावे. कुत्रासमोर दिसताच मांजराने बाजूला जावे तसं ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. प्रत्येक रात्र तिच्यासाठी नरकानुभव असे. रोज रात्री ती स्वतःच स्वतःच्या मरणावर अश्रू ढाळत असे... एक प्रसन्न पहाट. कुणी सडासंमार्जनात दंग, कुणी सकाळचे कार्यक्रम आटोपण्यात दंग तर कुणाची दिवसभर करावयाच्या कामांची आखणी सुरू. ओसरीवर