सौभाग्य व ती! - 8

  • 7.1k
  • 2.8k

८) सौभाग्य व ती ! स्वतःचा बडेजाव, श्रीमंती, वतनदारी थाट दाखविण्यासाठी आईच्या गोडजेवणासाठी सदाशिवने गावजेवण दिले. हजारो लोक जेवले परंतु नयनच्या माहेरचे कुणी आले नाही ही गोष्ट कुणाला नाही परंतु स्वतः नयनला खटकली. अण्णा, भाऊंना त्यांच्या व्यापातून वेळ नसला तरी कुणाला तरी पाठवायला हवे होते. अण्णा कसेही का होईना तोंडदेखलं येऊन गेले पण भाऊंनी ती तसदीही घेतली नाही. सख्ख्या मुलीची सासू वारल्यानंतर लेक-जावयाची भेट घेणे हे भाऊंचे कर्तव्य होतं पण भाऊ त्या साध्या परंतु आवश्यक कर्तव्यालाही जागले