पैशाचा पाऊस

(17)
  • 20k
  • 5k

मी एक साधा वेब डेव्हलपर आहे. मागील काही वर्षांपासून. त्याआधी अकौंटंट होतो. आजपर्यंत मला कधीही भूत / हडळ / खवीस / ब्रह्मराक्षस / वेताळ किंवा तत्सम व्यक्ती भेटलेल्या नाहीत. अगदी स्वप्नातही त्यांनी मला कधी दर्शन दिलेले नाही. काही वर्षांपासून मी फक्त माझ्या मनोरंजनासाठी कथा लिहितो. त्याही पूर्ण काल्पनिक असतात. त्यामुळे जर कुणाला असे वाटत असेल की मी या विषयातील जाणकार व्यक्ती आहे तर तो पूर्णपणे त्यांचा गैरसमज आहे. आता तुम्ही म्हणाल, मी हे का सांगतो आहे? अहो आजकाल सांगावेच लागते. कोण कोणत्या गोष्टीचा कोणता अर्थ काढेल हे त्या ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही. म्हणून हे आधीच सांगावे लागते. खरं नाही वाटत?