ये रातें, ये मौसम,नदी का किनारा, ये चंचल हवा.. कहा दो दिलों ने, कि मिलकर कभी हम ना होंगे जुदा... आज ती एकटीच तिच्या बंगल्याच्या टेरेस वर मोबाईल मध्ये गाणं लाऊन गुणगुणत बसली होती. सोबतीला त्याला आवडते अगदी तशीच कॉफी बनवून ती त्याचा आस्वाद घेत, बाहेरील निसर्ग बघत होती. फरक फक्त इतकाच की तो सोबतीला नव्हता. पहाटे धो धो कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली होती. नुकताच पाऊस येऊन गेल्याने आजूबाजूचा परिसर थंड आणि हिरवागार झाला होता. आज त्यांचा लग्नाचा १५ वा वाढदिवस होता. पण तिला कोणाशीच बोलायची किंवा कोणाच्या शुभेच्छा घेण्याची इच्छा नव्हती. म्हणून तिने मुद्दामच फोन फ्लाईट मोड वर