विभाजन - 2

  • 7.7k
  • 2.9k

विभाजन (कादंबरी) (2) ही देवळं पाडण्यानं व जबरदस्तीच्या धर्मपरीवर्तनानं मजबुरीनं जरी येथील मुस्लीम वगळता इतर धर्म चूप बसले असले तरी त्यांच्याही मनात असंतोष खदखदत होता. सामान्य माणसांमध्येही छोट्या छोट्या स्वरुपात आपल्या धर्माबद्दल आत्मीयता जाणवतच होती. फरक एवढाच होता की ते ती गोष्ट बाहेर काढत नव्हते. १८५७ चा उठाव होवून गेला होता. हिंदी सैनिक हारले असून पूर्णतः इंग्रजांचा भारतात जम बसला होता. मुघल साम्राज्य हे पूर्णतः दुबळे झाले होते. त्यामुळं काही काळासाठी का होईना तमाम हिंदूस्थानीय वासीयांना चूप राहणे भाग होते. कारण हे इंग्रजही मुस्लिम राज्यकर्त्यांच्याच नीतीचे होते. फरक एवढाच होता की हे सुधारणावादी होते. १८५७ चा राष्ट्रीय उठाव यशस्वी झाला