सौभाग्य व ती! - 10

  • 8.2k
  • 3.5k

१०) सौभाग्य व ती ! त्या दिवशी सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. पाऊस पडण्याची लक्षणं नसली तरी सूर्यदर्शनही होत नव्हतं. वातावरण कोंदट झालं होतं. खोलीत बसलेल्या प्रभाच्या मनात विचारांच्या ढगांनी गर्दी केली होती. तो मोठ्ठा वाडा दोन दिवसांपासून तिला जणू खायला उठला होता. महत्त्वाच्या कामासाठी सदाला नागपूरला जावून दोन दिवस झाले होते. त्या दोन दिवसातील एक क्षणही असा नव्हता, की ज्या क्षणी प्रभाला सदाची आठवण झाली नाही. 'का...का.. माझ्या मनाची अवस्था का अशी व्हावी? आपलं मन का कावरं बावरं व्हाव?