सौभाग्य व ती! - 11

  • 6.9k
  • 1
  • 3k

११) सौभाग्य व ती ! "नयन, सांभाळून राहा. स्वतःला, संजीवनीला जप. सदाशिवरावांना बोलू नको.काही झालं तरी तुला त्यांच्यासोबत आयुष्य काढायचे आहे..." बसस्थानकावर सोडायला आलेला बाळू नयनला म्हणाला. ज्या गोष्टी घरातल्या मोठ्या माणसांनी सांगाव्यात त्या गोष्टी लग्नाची हळद ओली असणारा बाळू सांगत होता. त्याच्या सहानुभूतीने नयनचे डोळे भरून आले. तिचा हात हातामध्ये घेत बाळूची बायको मीना म्हणाली, "नाही.असे नाही." ते ऐकून नयनला जास्तच भडभडून आलं. कुणी काही बोलण्यापूर्वीच बस आली.डोळे भरलेल्या अवस्थेत हातामध्ये सुटकेस आणि कडेवर संजूला सांभाळत ती मोटारीमध्ये शिरली. आसनावर