सौभाग्य व ती! - 12

  • 6.9k
  • 2.9k

१२) सौभाग्य व ती ! मालिनी म्हणजे नयनची चुलत बहीण! अण्णांची मुलगी. तिच्या लग्नासाठी बाळू, मीना आणि नयन गावी आले होते. लग्नाला येण्याचा सदाशिवला बाळूने खूप आग्रह केला. पण सदा तयार झाला नाही. मालिनीचे वय तसे सोळा वर्षाचे. तितक्या लहान वयात तिचे लग्न ठरविल्यामुळे नयन गोंधळली होती. आश्चर्य म्हणजे नवरदेव शिपाई म्हणून नोकरीस होता. अण्णासारख्या वतनदाराच्या मुलीचे लग्न एका शिपायासोबत? कसे शक्य आहे? परंतु सत्य स्थिती समोर होती. ते स्वीकारावेच लागले. त्याला इलाज नव्हता. लग्नाचा थाट अण्णा-भाऊंनी तोपर्यंत लावलेल्या इतर