कादंबरी- जिवलगा ...भाग -४१ वा .

(12)
  • 11.5k
  • 6.4k

कादंबरी – जिवलगा भाग – ४१ वा ------------------------------------------------------------ नेहा आणि सोनियाचा रविवार ..सुट्टीचा ,सगळ्या गोष्टी आरामशीर करण्याचा दिवस.. आज तिसरा मेंबर ..अनिता नव्हती ...ती आणि तिचा रोहन दोघे मिळून संसारची तयारी सुरु करण्याच्या स्वप्नवत कामात गुंतून गेले आहेत. या पुढे अनिता नावापुरती सोबत असणार हे मानून घेण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे. सोनिया म्हणाली .. नेहा ..आज तिकडे हेमूच्या गावी देखील ..सगळे जण घाई –गडबडीत असणार .. हेमूच्या घरी पाहुणे येणार , हेमूच्या मनात काय आहे ? हे आपल्याला माहिती आहे , पण बाकीच्यांना कुठे काय माहिती आहे ..ते तर आजच्या कार्यक्रमाची वाटच पाहत असणार . यावर नेहा सांगू लागली