सिद्धनाथ 2 (परतफेड) कडकडीत ऊन पडलेलं होत, रस्त्यावर वर्दळ अशी नव्हतीच, क्वचित एखादं दुसरी गाडी, बस, बाईक दिसे, सिद्धनाथ झप झप चालत होता, रस्ता चांगलाच तापलेला होता, "शिवगोरक्ष .. शिवगोरक्ष...." अचानक एक गाडी येऊन सिध्दनाथा च्या थोडं पुढे जाऊन थांबली होती, गाडीतून चव्हाण साहेब खाली उतरले होते, गाडीजवळ च बूट उतरवत सिद्धनाथा जवळ ते पोहोचले, पायाला चटके बसत होते, हात जोडले, "महाराज..मला ओळख ल का ..?" "म..मी ..", "इन्स्पेक्टर चव्हाण..!", सिद्धनाथा न त्यांचं वाक्य पूर्ण केलं "आज इकडे...एकदम गुजरातमध्ये???" "हो, जुनागड ला निघालो होतो, थोडं ऑफिस च काम" "महाराज, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला सोडू का तुम्हाला