" मैत्र.... " परिपाठ सुरू होता. शाळेपुढच्या ग्राऊंडवर सगळी मुलं रांगेत शिस्तीत उभी. पहिली रांग पहिलीवाल्यांची, दुसरी, तिसरी. अशा एकामागे एक रांगा. आमचा वर्ग आठवीचा. सर्वात शेवटचा. सर्वात शेवटी. राष्ट्रगीत - प्रतिज्ञा झाली. खाली बसलो. आणि हळू आवाजात आमची चर्चा सुरू. "नवीन मुख्याध्यापक आलेत.. "" हो रे खूप स्ट्रिक्ट आहेत म्हणे ते.. "" मग आपल्याला सांभाळून राहावे लागेल.. "" हो ना कसले बघतात बघ ना ते चष्म्यातून.. " समोरच्या खुर्चीवर बसलेल्या मुख्याध्यापकांकडे बघत आम्ही आमच्यात धुसफुसत होतो. इतक्यात मागच्या कुणीतरी माझ्या पाठीवर काहीतरी फेकले. मी वळून बघितले. खडूचा तुकडा होता. मी तो उचलला आणि परत एकाला फेकून मारला. हे आमचं नेहमीचंच. खोड्या