कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ९ वा

  • 9.5k
  • 4k

कादंबरी –प्रेमाची जादू भाग -९ वा ------------------------------------------------------- १. ---------------------- यशच्या घरची सकाळ , शनिवार दिवस ..अंजलीवहिनी आणि सुधीरभाऊ या दोघांच्या सुट्टीचा दिवस , ,त्यामुळे नेहमीप्रमाणे घराच्या इन - चार्ज अंजली वाहिनी . नाश्त्यासाठी सगळे एकत्र आले म्हणजे गेल्या आठवडाभरात काय झाले ? आणि पुढच्या आठवड्यात काय काय करायचे ? या कौटुंबिक चर्चेत हर एक जण सहभागी होऊन ..अपडेट देत असे, त्यामुळे सगळ्यांना झालेल्या आणि होणार्या गोष्टींची कल्पना असायची , या पद्धतीमुळे ..या सगळ्यांत एक उत्तम असा संवाद होता .एखादी गोष्ट ..मग ती कोणतीही असो ..ती सगळ्यांना माहिती असते . त्यामुळे .. “मला काय माहिती नाही ..अशी उत्तरे देण्याची वेळ कुणावर