संमातर प्रियेशी - 2

  • 5.2k
  • 1.8k

प्रेम बिल्लोरी-भाग 2 अनघाला तो मॉल मधला प्रसंग आठवू लागला. जसाची तसा. त्या दिवशी सांयकाळ झाली होती.कधी नाही त्या अनघा व सई दोघीचं पेठेत होत्या.असं एकटया त्या कधी फिरल्या ही नव्हत्या. क्लास संपला नि तश्याचं मार्केटमध्ये गेल्या.नेहाचा बर्थ डे होता.त्यांचा नेहाला सरप्राईजचा करायचा प्लॅन होता. दोघी असं छान गिप्टं घेऊन तिला सरप्राईजच करणार होत्या.सा-या मुली गेल्या नि या दोघीचं मॉल मध्ये शिरल्या.त्या मॉलमध्ये आल्या पासून दोन मुलं त्यांच्या मागावरचं होते.आता मुलांनी असं त्यांच्याकडं पहाणं, मागे फिरणं हे काही त्यांना ही नवीन नव्हतं.त्या मुली आहेत आणि ते मुलं आहेत.असं तर होणारचं. इटस्‍ कॉमन सारख सारखच एक टक पहात होते ते.