लेडीज ओन्ली - 6

  • 6.9k
  • 1
  • 2.7k

|| लेडीज ओन्ली ||[ भाग - 6 ] शहराच्या मोठ्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका दहा बाय दहाच्या छोट्याश्या टीनपत्र्यांच्या खोलीत विजयाताईंनी आपलं दुकान थाटलं होतं. दुकान छोटंच पण पुस्तकांची संख्या खूप जास्त. अगदी जुन्या पुराण्या दुर्मिळ पुस्तकांपासून धार्मिक, राजकीय, सामाजिक, चरित्रात्मक, ललित, काव्य, कथा, कादंबरी, बालसाहित्य, विद्रोही साहित्य अशा सर्व प्रकारांच्या पुस्तकांसोबतच शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाची पुस्तकंही त्यांच्याकडे उपलब्ध होती. जवळच एक दहावीपर्यंतची शाळा होती. त्यामुळे वही पेन पेन्सिल असं विद्यार्थ्यांना लागणारं साहित्यही त्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलं होतं. इतकंच नाही तर वह्या पुस्तकांच्या खरेदीसाठी पालकांसोबत येणारी मुलं चॉकलेट्स मागतात म्हणून ती ही त्यांनी विक्रीसाठी ठेवलेली होती. छोट्याश्या जागेत अतिशय कल्पकतेने कप्पे