कादंबरी- जिवलगा . भाग -४२ वा

  • 9.6k
  • 4.6k

कादंबरी – जिवलगा भाग -४२ वा ------------------------------------------------- हेमूच्या आग्रहामुळे मामा थांबला आहे, याचे हेमूच्या आई-बाबांना जरा आश्चर्यच वाटत होते. एव्हढे महत्वाचे काय सांगायचे असेल हेमुला ? ते मनाशीच विचार करू लागले . आणि हे उद्या सकाळीच कळणार आहे म्हणजे तो पर्यंत वाट पहावीच लागणार आहे , म्हणून ते स्वस्थ बसून राहिले . हेमू रात्रभर विचार करीत होता ..उद्या आपल्या आई-बाबांना नेहाच्या आणि आपल्या नव्या नात्याबद्दल सांगायचे आहे , तसे म्हटले तर .. हेमूने नेहाला तिच्या घरची काहीच माहिती विचारली नव्हती . तिच्या घरी कोण कोण आहेत , आई-बाबा काय करतात , पारिवारिक माहिती .या बद्दल कधीच काहीही विचारलेले नव्हते ,